ओबीसी आरक्षणाकरिता सर्व एकत्रित असले तरी प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने प्रयत्न करावेत-महादेव जानकर

Share This News

राष्ट्रीय समाज पक्ष पूर्वीपासून ओबीसी सोबत आहे मी अकरा जिल्ह्यात दौरा केला आहे मराठ्यांना ओबीसी आरक्षण वगळून आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये असं मत माजी मंत्री महादेव जानकर याने व्यक्त केलंय
पुणे शहराच्या पक्षबांधणी करिता ते पुण्यात आले होते पुण्यामध्ये विवीध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते
त्यावेळी ते बोलत होते
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पुण्यामध्ये धनकवडी बस स्टॉप येथे फुटपाथवर भाजी व्यवसाय करणाऱ्या गरिबांना मोफत छत्री वाटप करण्यात आले पुणे शहर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहरच्या वतीने यावेळी कार्यकरणीचा बैठक देखील घेण्यात आली
यावेळी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष चांगली कामगिरी करेल असे पुणे शहर कार्यकरणीच्या वतीने सांगण्यात आले
तसेच यावर्षी राष्ट्रीय समाज पक्षाचे 1 कोटी सभासद नोंदणी होईल असा आशावाद व्यक्त करून कार्यकर्त्यांना सूचना देखील करण्यात आल्या
या कार्यक्रमाला माजी मंत्री महादेव जानकर ,बाळासाहेब दोडतले , माऊली सलगर ,बाळासाहेब कोकरें , संजय माने उपाध्यक्ष पश्चिम ,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ सविता जोशी ,महिला प्रभारी सौ राजेश्री माने ,प्रभारी पुणे अप्पासाहेब सुतार ,प्रभारी पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होते पुणे शहर अध्यक्ष विनायक रुपनवर उपाध्यक्ष बालाजी पवार ,संपर्कप्रमुख अंकुश देवडकर, उमेश कोकरें ,राजेश लवटे ,महिला उपाध्यक्षा सुनीता ताई किरवे ,महादेव केरुळे यासह जिल्ह्यातील आणि शहरातही पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते