डोनेट एड सोसायटी व सेवा सहयोग फाउंडेशन च्या वतीने रिक्षा चालक व स्कुल वाहन चालक यांना मदतीचा हात

Share This News

सेवा सह्योग फाउंडेशन गेल्या दोन वर्षापासून या कोरोणा महामारी काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्य करत आहे. संस्थेच्या माध्यमातून सांगवी परिसरामध्ये आर्सेनिक अल्बम ,मास्क ,सॅनिटायझर याचे अनेक गरजूंना वाटप करण्यात आले, तसेच विविध कोविड रुग्णांना बेड मिळवून देणे, बिलाच्या संदर्भामध्ये त्यांना आर्थिक मदत करणे, पेशंट आणि त्याच्या घरच्यांना जेवणाच्या डब्याची मदत करणे ,तसेच अनेक गरजू लोकांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था ही संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली. नुकतेच काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयाला गरीब रुग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटअर ही डोनेट करण्यात आले. जेणेकरून गरीब रुग्णांना ऑक्सीजन नाही म्हणून उपचार नाही अशी वेळ येऊ नये ,म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच गेल्या एक दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे शालेय रिक्षा वाहतूक करणारे रिक्षा चालक आणि स्कूल व्हॅन चालक यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. या बेरोजगारीमुळे त्यांना घर चालवणे ही अशक्य झालेले आहे .दैनंदिन गरजा पूर्ण करणे दुर्दम्य झाले आहे. अशा काळामध्ये माननीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सहयोग फाउंडेशनचे कृष्णा भंडलकर आणि सारिका कृष्णा भंडलकर यांनी अशा रिक्षाचालकांसाठी एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा, या ध्येयनुसार त्यांना किमान काही दिवसाचे सोय व्हावी या हेतूने धान्याचे कीट याचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी सांगवी विभागातील सुमारे दीडशे रिक्षा चालक आणि स्कूल वाहन चालक यांना या धान्याचे किटस माननीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप तसेच सारिका कृष्ण भंडलकर आणि कृष्णा भंडलकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मनोगत व्यक्त करताना माननीय आमदारांनी रिक्षाचालकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार आहेत याविषयी माहिती दिली. यावेळी माननीय नगरसेवक संतोष कांबळे, श्री हर्षल ढोरे, श्री महेश जगताप, सिनेट सदस्य संतोष ढोरे, तसेच आमदारांचे स्वीय सहाय्यक श्री बाला शुक्ला त्यावेळेस उपस्थित होते.तसेच डोनेट एड सोसायटी चे श्री नितीन घोडके, सौ हिमानी नारखेडे, सौ किशोरी अग्निहोत्री उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा भंडलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सारिका कृष्णा भंडलकर यांनी केले या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ,श्री बाबू गंगावणे, दीपक मोहिते हेमंत कांबळे ,प्रशांत गंगावणे ,हेमा गंगावणे, मंजीत कौर ,विकास ढोरे, प्रकाश शिंदे, मयूर शेलार आदी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. आगामी काळामध्ये ही अशीच वेगवेगळे उपक्रम माननीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे अशी माहिती सेवा सहयोग फाउंडेशन चे अध्यक्ष कृष्णा भंडलकर यांनी दिली.