पुणे शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे यांनी वाढदिवस समाजोपयोगी कार्याने साजरा केला त्यांनी २००० महिलांना छत्री,२०० रिक्शा ड्रायव्हर्सना रेशन किट, व विश्रामबाग, खडक आणि फरासखाना पोलिस स्टेशनला प्रत्येकी ५ बॅरिकेटस प्रदान केले. या कार्यक्रम प्रसंगी विधान परिषद उपसभापती मा.ना.नीलमताई गो-हे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र नेर्लेकर, पुणे संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, शहर प्रमुख संजय मोरे, शहर प्रमुख गजानन थरकुडे, माजी शहर प्रमुख रामभाऊ पारिख, राजेंद्र शिंदे, राजाभाऊ भिलारे, सूरज लोखंडे ,अमृत पठारे, निर्मला केंडे, आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना नीलम गो-हे यांनी कोरोना संपला नसून नागरिकांनी काळजी घ्यावी असे संगितले, रवींद्र नेर्लेकर यांनी शिवसेना नेहमी सामाजिक कार्यात पुढे असते असे संगितले. आपल्या वाढदिवसाच्या आनंदात सर्व नागरिकांना सेवा मिळून आनंद व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे बाळासाहेब मालुसरे यांनी नमूद केले.
छायाचित्र :छत्री वाटप करताना मान्यवर.