पुणे दि.३० : शिवसेनेच्या वतीने पुण्यासाठी आरोग्य साहित्याची मोठयाप्रमाणात वाटप करण्यात आले आहे. सामाजिक संस्थेच्या मदतीने कोव्हिडं-१९ च्या सेंटरची उभारण्यात करण्यात आली आहे. सध्या पुणे तसेच ग्रामीण भागातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने आलेख कमी होताना दिसत आहे. असे असले तरी देखील काळजी घेण्याचे आवाहन विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. त्या पेप्सीको व फिनोलेक्स कंपनीच्या वतीने सीएसआरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पाच ऑक्सिजन काॅन्सट्रेटर्स कोव्हिडं-१९ सेंटरला प्रदान करण्यात आलेल्या वेळी डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, नुकतेच झालेल्या तौख्ये व यास वादळामुळे पुण्यातील मुळशी, भोर, वेल्हा व इतर भागात झालेल्या नुकसानाची माहिती देण्याचे आवाहन केले जेणेकरून लोकांना पंचनामे करून मदत करत येईल यासाठी उपसभापती कार्यालयास माहिती देण्याची सूचना ना.डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केली.
शिवसेना मुख्यमंत्री ना.ऊद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार, शिवसेना युवा नेते ना.आदित्यजी ठाकरे यांच्या आखणीनुसार व ऊद्योगमंत्री ना.सुभाषजी देसाई यांच्या संयोजनामुळे आज सुस गाव, ता.मुळशी, जि. पुणे येथील कोविड केअर सेंटरला पाच काॅन्सट्रेटर्स ना.नीलमताई गोर्हे यांनी जिल्हाप्रमुख श्री.बाळासाहेब चांदेरे व संपर्कप्रमुख श्री.सत्यवान ऊभे याच्यांकडे प्रदान केले.
या पाच काॅन्सेटिरेटर्स मध्ये पेप्सिको कंपनीच्यावतीने तीन व फिनोलेक्स च्या वतीने दोन काॅन्सट्रेटर्सचा समावेश होता.
यावेळी स्वाती ढमाले, संगीता पवळे , संतोष मोहोळ, सचिन खैरे,संतोष कोंडे, सुवर्णा करंजावणे, ज्ञानेश्वर डफळ, संतोष तोंडे, गणेश साळुंके नवनाथ भेगडे दिपक जगताप ज्ञानेश्वर केमसे, मोहन शिंदे आदि उपस्थित होते .