रिक्षाचालकांच्या प्रश्नांसंदर्भात पर्वती विधानसभा सरचिटणीस संकेत शिंदे यांचे प्रशांत जगताप यांना निवेदन.

Share This News

पुणे दि २७: नुकतीच शासनाने परवाना धारक रिक्षचालकांना १५००/- अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
परवाना धारक रिक्षाचालकांव्यतिरिक्त अनेक रिक्षाचालक हे शिफ्ट ने रिक्षा घेऊन आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. तसेच अनेक रिक्षाचालकांच्या मृत्युनंतर त्यांची परमिट त्यांच्या पत्नीच्या नावे झाल्याने त्या दोन्ही वर्गांना सदर योजनेचा लाभ मिळू शकत नाही. या लोकांना किमान अनुदान दिल्यास त्यांना देखील संसारात थोडाफार हातभार लागेल.या संदर्भातले निवेदन नुकतेच राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप यांना प्रत्यक्ष भेटून दिले. प्रशांत जगताप यांनी सदर प्रश्न शासनाकडे मांडून पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी