रोटरी ३१३१ आणि आरएमबी पुणे बिझनेस सर्कलच्या वतीने महानगर पालिकेस मास्क, सँनिटायझर, व पिपीई किट प्रदान.

Share This News

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या प्रकोपाने उपचारासाठी काही महत्वाच्या साधनांची गरज भासते. प्रशासनास मदत व्हावी या हेतूने रोटरी व रोटरी मिन्स बिझनेस सर्कल पुणे व प्रभाकर बंटवाल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महानगर पालिकेस सुमारे तीस हजार मास्क, एक हजार लिटर सँनिटायझर, एक हजार पिपीई किट प्रदान करण्यात आले. पुणे महानगर पालिकेत संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिति अध्यक्ष हेमंत रासने, उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी प्रांतपाल रो.डॉ.दीपक शिकारपूर, प्रभाकर बंटवाल, रो.दिलीप कुंभोजकर, रो.महेश सप्तर्षी, रो.आनंद जोशी, हुजेफा बहरिणवाला, हसनैन बहरीणवाला, रो,शीतल शहा, रो.जय शहा आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले तसेच आगामी काळात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स व अन्य साधनांची मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

छायाचित्र :रोटरी व मनपा पदाधिकारी यांचे संयुक्त चित्र.