पुणे* : वैकुंठ स्मशानभूमीत *पुणे माहानगरपालिका, स्वरूप वर्धिनी, सेवा सहयोग व सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प* या संस्थेंमार्फत गेले अनेक दिवसांपासून कोविड आणि इतर मृतदेहावंर अत्यसंस्कार करण्याचे काम करण्यात येत आहे. भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांच्यावतीने प्रत्यक्ष वैकुंठात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी महापौरांच्या हस्ते वाफेचे मशिन भेट देण्यात आले.
‘अवघड काळात ज्या स्वयंप्रेरणेने आपण काम करत आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे’ असे गौरव उदगार महापौर यांनी काढले.
स्व’-रूपवर्धिनी, सेवा सहयोग व सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प यांच्याद्वारे केले जाणाऱ्या या कामाचे कौतुक महापौर यांनी केले.
यावेळी माजी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, नगरसेवक धीरज घाटे , स्मिताताई वस्ते, सदानंद गौडा, शैलेश लडकत, सामाजिक कार्यकर्ते संतोष लांडे, विक्रम बर्गे, स्वप्नील महाडिक, लक्ष्मीकांत मोरे, निलेश पारीख, निलेश धायरकर व स्वरूप वर्धिनीचे कार्यवाह विश्वास कुलकर्णी हे उपस्थित होते. *राजे शिवराय प्रतिष्ठांनने कार्यक्रमाचे संयोजन केले होते.*