पुणे :
कोरोना रुग्णांच्या उपचारानंतर त्यांना येणाऱ्या शारीरिक ,मानसिक आर्थिक तणावावर दिलासा देण्यासाठी जेएससी एज्युकेशनल ट्रस्ट च्या पुढाकारातून कोरोना रुग्णांसाठी पुण्यात पोस्ट कोविड रिहॅब सेंटर सुरु करण्यात येत आहे.’पोस्ट कोविड प्रिकॉशन अँड ट्रीटमेंट सेंटर ‘ असे या रिहॅब सेंटर चे नाव असणार आहे. यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. ट्रस्ट च्या संस्थापक डॉ स्नेहा जोगळेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.अशा स्वरूपाचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.
शुक्रवारी दुपारी पुणे श्रमिक पत्रकार संघात ही पत्रकार परिषद झाली.
साई राम अपार्टमेंट,वनाझ कॉर्नर(कोथरूड ) येथे हे रिहॅब सेंटर सुरु करण्यात येत असून अक्षय तृतीया,१४ मे रोजी सकाळी १० वाजता उदघाटन होणार आहे.
कोरोना मधून सहीसलामत बचावल्यानंतर देखील कोरोना रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कोविड नंतर घ्यायची काळजी ,उपचार यावर मार्गदर्शन केले जाणार आहे . कोणत्याही औषधाविना समुपदेशन (टेली कौन्सिलिंग)च्या माध्यमातून,आहार -विहार मार्गदर्शन ,फिजिओथेरपी,स्पिरिचुवल हीलिंग,ऍक्युप्रेशर,फूट रिफ्लक्सॉलॉजी,शास्त्रशुद्ध श्वासोछवास,डिटॉक्स,व्यायाम अशा स्वरूपाचे मार्गदर्शन केले जाणार आहे .
डॉ स्नेहा जोगळेकर ,डॉ राज पवार ,ज्योती कुंभार (एक्युप्रेशर थेरपिस्ट ),विनय नाफडे ( स्पिरिचुवल हीलिंग एक्स्पर्ट ) इत्यादी तज्ज्ञ या सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत . रिहॅब सेंटरसाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.कोरोना रुग्णांना ९५२९५१५४२८ या हेल्पलाईन वर समुपदेशनासाठी संपर्क साधता येईल . हा उपक्रम नाममात्र शुल्क घेऊन चालविला जाणार आहे . सेंटर मधील सुविधा चारशे रुपये इतक्या नाममात्र दरात उपलब्ध करण्यात आल्या असून अनेक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत . पुण्यातील आणि राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या सेंटर च्या विस्तारासाठी देणग्यांचेही आवाहन करण्यात आले आहे .