पुणे, ४ मे २०२१: सामाजिक चौकटीत राहून काम करणार-या कार्यकर्त्याला जरी खासदार,आमदार होता आल नाही तरी त्याची उंची कमी होत नाही. प्रा .हिबारे सर नेहमीच कामाला महत्त्व देणारे आणि कार्यकर्त्यांना साथ देणारे व्यक्ती होते. केव्हाही त्यांनी आपली जवाबदारी चुकवलेली मला आठवत नाही.
युवक क्रांती दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, समाजवादी विचारवंत, लेखक, नाट्य अभिनेते, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य मनोहर हिबारे यांना श्रद्धांजली आर्पण करण्यासाठी सोमवार, दि. ४ मे रोजी झूम द्वारे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती मा.ना निलमताई गोऱ्हे उपस्थित होत्या.या प्रसंगी त्या बोलत होत्या. सभेला प्रमुख पाहूने म्हणून डॉ. भालचंद्र मुणगेकर (मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू,माजी खासदार माजी नियोजन आयोगाची सदस्य) तसेच खासदार हुसेन दलवाई (थोर समाजवादी नेते) होते. तर प्रा. आर एन जाधव (उपप्राचार्य, कनिष्ठ), डॉ. राजकुमार मस्के(उपप्राचार्य), डॉ. आर आर तांबोळी, प्रा. मनोहर पटवारी (सचिव, एम ए सोसायटी), बस्वराज पाटील (अध्यक्ष, एम ए सोसायटी) आदि मान्यवर उपस्थित होते. डॉ. ज्ञानोबा कदम (राष्ट्र सेवा दल) यांनी सभेचे सुत्रसंचालन केले.
स्व. प्रा. मनोहर हिबारे यांच्या निधनाने हिबारे कुटुंबियांच्या दुखात आम्ही सहभागी आहेत अशा भावना व्यक्त करून डॉ. गोऱ्हे यांनी स्व.मनोहर हिबारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी उदगीरच्या काही आठवणींना देखील उजाळा दिला.
हुसेन दलवाई म्हणाले, प्रा. मनोहर हिबारे गेल्याची वार्ता एकूण अतिशय दु:ख झाल. अनेक वेळा त्यांच्या सोबत राहण्याचा योग आला होता. त्यांचे संपूर्ण कुटुंब चळवळीत होते. मनोहर हे सर्वाना सांभाळून घेणारे व्यक्ती होते. असे व्यतिमत्व आज आपल्यातून गेले त्याना मी श्रद्धांजली अर्पण करतो.