सध्याच्या भीषण अशा कोविड महामारीच्या दुसर्या लाटेच्या काळात नगरसेवक वा अन्य मान्यवर संपर्कात राहिलेच नाहीत. अशा प्रसंगी पवळे चौक कसबा येथील एक कार्यकर्ता परवेझ तांबोळी हे अत्यवस्थ रुग्णांना अॅडमिट होईपर्यंत मोफत ऑक्सीजन पुरवठा करीत आहे. यासाठी त्यांनी २० किट विकत घेतले असून त्यात ऑक्सीजन सिलेंडर(बॉटल)आहेत. रुग्णाची व्यवस्था होईपर्यंत ते रुग्णांना मोफत ऑक्सीजन पुरवतात. तसेच अर्ध्यारात्री सुद्धा बेड मिळवून देणे. प्लाझ्मा इत्यादींसाठी मदत करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे ५० रुग्णांची ऑक्सीजन सेवा केली आहे.
छायाचित्र :परवेझ तांबोळी