पुणे: सक्षमीकरणाचे धडे अनेकदा आपण ऐकतो, वाचतो कारण जीवनात त्याची आवश्यकता आपण जणतो. तसेच एक संस्था यशस्वीपणे सांभाळाची, जोपासायची असेल तर संस्थांचे देखील सक्षमीकरण होने गरजेचे आहे. जीवनदीप’चे वार्षिक अंक असो अथवा आज प्रकाशित केलेले ई-मासिक हे या विविध क्षेत्रातील संस्थांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयोग आहे; असे प्रतिपादन उपसभापती, विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
अनेक सामाजिक संस्थांच्या कामाची माहिती जनमानसात पोहचवण्यासाठी तसेच समाजातील विविध प्रश्नाना स्पर्श करण्यासाठी ‘जीवनदीप’ या ई-मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन डॉ. नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधानपरिषद महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनुराधा राजाध्यक्ष (अभिनेत्री), महेश पवार (संपादक), अश्विनी भोईर (कार्यकारी संपादक), दिपा ठाणेकर, तसेच संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संबोधीत करतांना डॉ.गोर्हे म्हणालात, शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या या संदेशा प्रमाणे आपण बोलत व्हा, ऐकते व्हा, आणि लिहिते व्हायला पाहिजे. त्यामुळे तुमचे काम हे इतरांना व्यक्त होण्यासाठी सहज होईल. या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी त्यांना ‘जीवनदीप’च्या सर्व टीमला तसेच विविध क्षेत्रात काम करत असलेल्या संस्थांचे कौतुक केले शुभेच्छा दिल्या.
महेश पवार (संपादक) म्हणाले, राज्यातील विविध सामाजिक संस्थांसोबत काम करने म्हणजे नात्यापडिकलच्या नात्याचा अनूभव घेण्यासारखे आहे. आजतागायत थंडरबोल्ट किंवा जीवनदीप वार्षिक अंक असो यात प्रामुख्याने प्रकाशित झालेले लेख अनेकदा उपयोगी ठरले; अनेक संस्थाना मदतीचे हात देखील लाभले. परंतु अजून विविध विषयांना स्पर्श करता यावा यासाठी जीवनदीपचे ई-मासिक सरू करण्याचा प्रयत्न केला आहे.
या दुरदृष्य सभेचे सुत्रसंचालन दिपा ठाणेकर यांनी तर आभार अश्विनी भोईर यांनी मानले.