पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यांना मनसेचा “मराठी शिलेदार” पुरस्कार प्रदान.

Share This News

किरण पुरंदरे हे पक्षितज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक व लेखक आहेत
त्यांना #मराठीशिलेदार पुरस्काराने गौरवण्यात आले. पुणे शहरात राहून त्यांनी गेल्या काही वर्षात शेकडो निसर्गप्रेमी तयार केले. मराठी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. विदर्भातील नागझिरा या जंगलात सलग ३६५ पेक्षा जास्त दिवस राहून गूढ जंगलातील वास्तव ‘सखा नागझिरा’ या पुस्तकरूपातून त्यांनी वाचकांसमोर आणले. तसेच त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून वृत्तपत्रांतूनही विपुल लेखन केलेले आहे. शहरातील शाळांबरोबरच दुर्गम भागातील मुलांपर्यंत त्यांनी निसर्ग संरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे त्यांनी भटकंती केलेली आहे. वन्यप्राण्यांसाठी त्यांनी ‘निसर्गस्नेही तळी’ ही संकल्पना यशस्वीरीत्या राबविली. त्यांना अनेक पक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढता येतात. काही वर्षांपूर्वी ते
नागझिरा अभयारण्यात कायमस्वरूपी जंगलात वास्तव्यास गेलेले आहेत तेथे त्यांना हा पुरस्कार पाठवण्यात आला.      या उपक्रम संबंधी माहिती देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते यांनी मराठी राज्यभाषा दिन २७ फेब्रुवारी ते महाराष्ट्र दिन १ मे यादरम्यान मराठीत सही व मराठी साठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार असे दोन उपक्रम राबविण्यात येत आहे असे सांगितले.