*कोविड कालावधीत स्थलांतरीतांच्या समस्येबाबत फ्लेम विद्यापीठाच्या ” सरव्ह्यायवल ऑफ मायग्रंट्स इन क्रायसिस” या अहवालाचे प्रकाशन उपसभापती,विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले.*

Share This News

पुणे: दि.२४: कोवीड १९ महामारी मुळे देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली.या टाळेबंदीचा शहरी भागाचा कणा असलेल्या स्थलांतरित मजूर लोकांवर शारीरिक, आर्थिक, मानसिक कसे परिणाम झाले त्याचे सविस्तर निरीक्षण फ्लेम युनिव्हर्सिटी ने तयार केलेल्या अहवालात मांडण्यात आले आहेत. सदर अहवालाचे प्रकाशन डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
या अहवालाचे प्रकाशन करताना डॉ . गोऱ्हे यांनी सर्व टीम चे अभिनंदन केले.कोरोनाामुळे लॉक डाउन झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितिबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ज्यावेळी हे संकट आले त्यावेळी जगातील कोणतेही सरकार, अशासकीय संस्था या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार नव्हत्या. भारतातील मागच्या चार पाच पिढ्यांनी महायुद्ध ही पाहिले नाही. त्यामुळे सर्वांसाठीच हे संकट नवीन होते. मध्यमवर्ग लोकांच्या हातात पुरेसा पैसा आल्यामुळे लोकांचे राहणीमान उंचावले होते. सुशिक्षित ऊच्च श्रीमंतात एक प्रकारचा चंगळवाद लोकांमध्ये बळावला होता. आणि अचानक २२ मार्च रोजी केंद्र सरकारने लॉक डाउनची घोषणा केली. अशा परिस्थितीत लोकांच्या मनामध्ये अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले. लोक आपल्या जीवनावश्यक वस्तूचा साठा करण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा केली व त्वरित लोकांना दिलासा दिला.
देशात टाळेबंदी लागू झाल्यानंतर स्थलांतरित कामगारांना ट्रेन कधी सुरू होतील याची आस लागली होती.
टाळेबंदीच्या काळात या कामगारांना बऱ्याच आर्थिक,मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले. असंघटित लोकांच्या हक्कांबद्दल सरकारकडून काय करणे शक्य आहे,याबद्दल आमचे प्रयत्न सुरू आहेत. असंघटित कामगारांची माहिती तयार करण्याबाबत मी या आधीही पुणे महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोविड काळात मी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांशी स्थलांतरित मजुरांच्या समस्यांबाबत चर्चा केली व त्यांच्या जेवणाची व निवासाची सोय करण्याबाबत त्यांना आदेश दिले.अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी या काळात उल्लेखनीय काम केले आहे.
कोविड च्या काळातही स्थलांतरित मजूर जे आपापल्या गावी गेले त्यांच्यासाठी ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध नव्हता. म्हणून शासनाची रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याबाबत रोजगार हमी चे मंत्री व शासकीय वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर अनेक बैठक घेतल्या व कामे सुरू करण्याच्या निर्देश दिले. राज्य सरकारच्या कामातुन रोजगार हमी कामावर वीस लक्ष लोकांना रोजगार मिळाला. त्यातील 60 ते 70 टक्के या महिला होत्या.
असंघटित कामगारांसाठी सरकारने कोणत्या विविध योजना सुरू करायचा याबद्दल एक शिफारसी तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी आम्ही चार ते पाच विभागांसोबत बैठका घेऊन पाठपुरावा करत आहोत अशी माहितीही यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी दिली.

स्थलांतरित मजुरांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांबद्दल डॉ.शिवकुमार जलोद,डॉ.शलाका शहा आणि श्री.चैतन्य रवी यांनीही यावेळी त्यांची निरीक्षणं सादर केली.