शासन,सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांनी एकत्र काम करून स्त्री पुरुष समानता निर्माण केली पाहिजे- चांदनी जोशी*
जागतिक महिला आयोगच्या ६५ व्या वर्षानिमित्त स्त्री आधार केंद्र ने समांतर चर्चा सत्र आयोजित केले होते. या मध्ये कोविड महामारी या जागतिक संकटाचे शाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती साठी व स्त्री पुरुषसमानता निर्माण करण्यासाठी संधीत रूपांतर कसे करता येईल याबाबत ऑन लाईन चर्चा सत्र दि २१ मार्च, २०२१ रोजी आयोजित केले होते.
या चर्चा सत्रात महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, नेपाळ मधून चांदनी जोशी, अपर्णा वाईकर ,शांघाय चीन, अजय झा, अपर्णा पाठक पुणे,जेहलम जोशी ,भारत व सुत्रसंचालक म्हणुन सतलज दिघे, मिनेसोटा अमेरिका ह्यांन चर्चासत्रात भाग घेतला होता.
डॉ नीलम गोऱ्हे यांनी चर्चा सत्राची सुरुवात करताना उपसभापती विधान परिषद म्हणून काम करताना आलेले विविध प्रकारचे अनुभव सांगितले. यामध्ये विविध देशात अडकून पडलेले विद्यार्थी,पर्यटक याना भारतात आणताना केलेल्या विविध स्तरावरील प्रयत्नाबाबत सविस्तर विवेचन केले. भारतातील विविध ठिकाणी अडकून पडलेले व्यक्ती यांना आपापल्या गावी चालत अथवा वाहनाने किंवा रेल्वे ने परत सोडत असताना शासनाने केलेली विविध प्रकारची मदत व सामाजिक संस्थांचे योगदान यामुळे हा अचानक निर्माण झालेल्या आपत्ती मध्ये सर्व यंत्रणांचा कस लागला. या कालावधीत अनेक प्रश्न सर्वाना सहन करावे लागले विशेषतः महिला वर्गाचे काम व त्रास तिप्पटपेक्षा ज्यास्त झाला. महिलांना घरगुती हिंसाचाराला तोंड द्यावे लागले. मानसिक दडपण व भिती निर्माण झाली. घरकामगारांपैकी जवळपास ८५% लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काही शासकीय अधिकारी व कर्मचारी हे ४०/५० दिवस घरी जाऊ शकले नाहीत. उपसभापती कार्यालयाने स्थानिक स्थरावर रुग्णांना हॉस्पिटल उपलब्ध करून देणे, रुग्णांची चाचणी करणे व त्याचा अहवाल लवकरात लवकर मिळविणे,औषधे उपलब्ध करून देणे,रुग्णाचे नातेवाईकांना धीर देणे याप्रकारची कामे केली.
या कालावधीत जे आपापल्या गावी गेले त्यांच्यासाठी गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या रोजगार हमी विभागाची बैठक घेऊन चालना दिली. त्यामुळे जवळपास २० लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला.त्यामध्ये ८ लाख महिला एकल कुटुंब प्रमुख होत्या . या महामारीमुळे नवीन मित्र म्हणून मास्क,सॅनिटीझर,आँक्सीमीटर,हातमोजे,लस मिळाले. स्थानिक विकास निधीमधून ३ रुग्णवाहिका (प्रत्येकी १२ लाख),२५ लाख पीपीई किट साठी ७२लाख निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये आपली संसाधने योग्य प्रमाणात व प्रकारे वापरावी व आपल्या कुटुंबाची,अन्नाची किंमत समजली असे प्रतिपादन केले.
चांदनी जोशी यांनी काठमांडू, नेपाळ वरून बोलताना गरीब,पीडित, असंघटीत कामगार यांचे प्रश्न मांडले. त्यांनी सर्व समाज्यात भीतीचे वातावरण होते व जग आता संपेल अशी धारणा होती असे सांगितले. महिलांना घरगुती हिंसाचारला व असमानतेला सामोरे जायला लागले.महिलांसाठी ही महामारी एक संयमाची परीक्षा घेणारी ठरली. त्यामुळे शाश्वत विकासाच्या उद्दीस्थांचे महत्व खूप अधोरेखित झाले. डिजिटल ऐक्याची आवश्यकता व सर्वानी एकत्र येऊन समानता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे यावर भर दिला. शाश्वत विकास उद्दिष्ट्ये ही सर्व मान्य उद्दिष्ट्ये असून ती सर्वांच्या प्रयत्नाने साध्य होऊ शकते असेही सांगितले.
अजय झा यांनी शाश्वत विकासाच्या उद्दिष्टमध्ये काम अत्यंत कमी झाले आहे. त्याची गरज महामारीमध्ये स्पष्ट जाणवली असे सांगितले. महिलांचे आर्थिक जीवनावर मोठा परिणाम झाल्याचे ते म्हणाले. वातावरणातील बदल हा मोठा प्रश्न असून यावरती काम करणे आवश्यक आहे. तसेच समानता आणण्यासाठी नियोजन करावे लागेल असेही अधोरेखित केले.
अपर्णा वाईकर ह्या शांघाय चीन मधून जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी कोविड महामारी चीन मधून सुरू झाली. पण त्याचे वाईट परिणाम ही तात्काल दिसायला लागले. त्यांनी महिलांची मानसिक परिस्थितमधील बदल,कामात झालेली प्रचंड वाढ,शैक्षाणिक प्रश्न यामुळे महिलांना आलेली निराशा याबाबत सविस्तर माहिती दिली. अनेक समुपदेशन गट करून,WA द्वारे,टेलिफोन द्वारे गट करून, व्हीडिओ व टेलिफोन कॉन्फरन्स द्वारे महिलांना समुपदेशन केल्याचे सांगितले.
स्त्री आधार केंद्र च्या अपर्णा पाठक यांनी संस्थे मार्फत महिलांना या कालावधीत त्यांना असलेला कायद्याचा आधार,वैद्यकीय मदत,समुपदेशन बाबत सांगितले.
जागतिक प्लॅटफॉर्म वरील चर्चेमध्ये शेवटी डॉ नीलम गोऱ्हे यांनी तरुण पिढीचा सहभाग वाढविणे,डिजिटल प्लॅटफॉर्म चा चांगला वापर करून समानता व शाश्वत विकास च्या उद्दीतांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.केंद्रसरकार व राज्यसरकार या दोन्ही स्तरावर सहकार्यं हवे आहे असे मत मांडल
यावेळी स्त्री आधार केंद्राच्या संस्थापिका सदस्य जेहलम जोशी,मुक्ता करंदीकर, डॉ अहंकारी सहभागी झाले होते. मुक्ता करंदीकर यांनी सर्व सहभागी यांचे आभार मानले.