रोटरी क्लब फोरचूनचे माजी अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोषणीवाल यांनी वाढदिवसानिमित्त भुगाव येथील मनव्य संस्थेतील मुलांसोबत केक कापला, त्यांनी ६३ वे रक्तदानही केले. येथील मुलामुलींना स्नेह भोजन व चॉकलेटस दिले. या प्रसंगी दीपक तोषणीवाल, शिल्पा तोषणीवाल, शिरीष लवाटे(संचालक मनव्य), राम वायदंडे(व्यवस्थापक मनव्य). डॉ.अश्विनी देशपांडे आदी मान्यवर व सुमारे ४० मुलेमुली उपस्थित होते.
छायाचित्र :मनव्य येथील मुलांसोबत केक कापताना दीपक तोषणीवाल,शिरीष लवाटे.