उन्हाळ्यात लसीकरण केंद्रावर योग्य त्या सुविधा द्या – मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Share This News

राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता मिळाली असून ३ ते ४ महिन्यांत प्राधान्य गटाला २ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. उन्हाळ्यामुळे लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत दिले.

रोज ३ लाख लसी दिल्या गेल्या पाहिजेत यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.