- पुणे :
जेएससी एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण,प्रशिक्षण,रोजगार मार्गदर्शन यासाठी महिला दिनी ‘मनु सेना ‘ हा मंच स्थापन करण्यात येणार आहे. जेएससी एज्युकेशन ट्रस्ट च्या संस्थापक डॉ स्नेहा जोगळेकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली .
८ मार्च रोजी ट्रस्ट च्या वनाझ कॉर्नर (कोथरूड ) येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता या मंचाचे उदघाटन होणार असून डॉ. अद्वैत देशपांडे हे स्वसंरक्षण प्रशिक्षण देणार आहेत. अॅड . चंद्रशेखर सबनीस हे स्त्री संरक्षण विषयक कायद्यांची माहिती देणार आहेत . तर ओम वाघ सोशल मीडिया वरील वावरादरम्यान घ्यायच्या काळजीची माहिती देणार आहेत .
युवती आणि महिलाना कायद्याचे ज्ञान ,स्वसंरक्षण ,शैक्षणिक सबलीकरण ,रोजगार मार्गदर्शन ,आपत्ती व्यवस्थापन अशा विषयांवर सक्षम करण्यासाठी ‘मनू सेना ‘ हा मंच स्थापन करण्यात येत आहे . झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या मनकर्णिका नावावरून प्रेरणा घेत ‘मनू सेना ‘ स्थापन करण्यात येत असल्याचे डॉ स्नेहा जोगळेकर यांनी सांगितले .