*रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर व सिद्धी हेल्थ क्लब तर्फे रक्तदान शिबीर संपन्न*

Share This News

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे रक्ताची वाढती मागणी लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर आणि सिद्धी हेल्थ क्लब कोथरूड पुणे ह्यांचे संयुक्त विद्यमाने सह्याद्री ब्लड बँक पुणे ह्यांचे सहकार्याने व सिद्धी हेल्थ क्लब, पौड रोड, पुणे येथे नुकतेच रक्तदान शिबीर संपन्न झाले. ह्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (इलेक्ट) रो. पंकज शहा  ह्याचे हस्ते  सकाळी ९.३० वाजता झाले. या प्रसंगी श्री. श्रीनिकेत शिंदे, श्री. हेमंत बढे, श्री लक्ष्मीकांत रांजणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रकल्पात सोशल डिस्टन्स पळून व अत्यंत शिस्तीत ५० दात्यांनी रक्तदान करून उच्चांक  प्रस्थापित केला. दात्यांमध्ये स्त्रिया, युवक, युवती दात्यांचा मोठया प्रमाणात सहभाग होता. सिद्धी हेल्थ कलाबच्या वतीने अनेक तरुण व तरुणींनी रक्तदान करून सद्य परिस्तिथीत सर्वांना रक्तदान करण्याचे आवाहन सोशल मीडिया वर केले. श्री अनंत सुरये व सौ सायली सुरये ह्या दाम्पत्याने रक्तदान करून, व श्री प्रवीण येवले ह्यांनी आपले २५ वे रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवला. रोटरीच्या चालू वर्षातील लोकमान्यनगर क्लब चा हा दुसरा रक्तदान शिबीर प्रकल्प होता. ह्या प्रकल्पात रोटरीच्या वतीने प्रेसिडेंट अॅंड. आनंद माहूरकर, प्रकल्प प्रमुख श्री अनंत सूरये, मेडिकल डायरेक्टर डॉ. मधुरा विप्र, श्री. रवींद्र पाटील तसेच सिद्धी हेल्थ क्लब तर्फे संस्थापक श्री शेखर शिंदे, श्री मनोज गायकवाड, श्री सुरज कवणकर व सह्याद्री ब्लड बँके तर्फे डॉ. अनघा पळसकर ह्यांनी सहकार्य केले.